
‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ ही अंड्याची जाहीरात चांगलीच गाजली होती. अनेक जण आपल्या दररोजच्या नाश्त्यामध्ये अंडी खातात. कुणी अंड उकडून खातं तर कुणी पोळी करून. काहींना अंड अर्ध कच्च शिजवलेलं, हाफ फ्राय केलेलं आवडतं. तर काही जण तर कच्च अंड दुधातून पितात. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. त्यामुळे दररोज अंड खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कच्चे अंडे खाणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.
अंडे वेगवेगळ्याप्रकारे खाल्ले जाते. मात्र अंड्याबाबत अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा बोललं जातं की कच्च अंड खाल्ल तर जास्त फायदा होतो. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. अंड उकडून किंवा फ्राय करुन खाल्ल्यावरही ते तेवढेच पोषक असते. जेवढे कच्चे खाल्ल्यावर असते. याबाबत युनायटेड स्टेट्स डिपार्टमेण्ट ऑफ अॅग्रीकल्चरच्या म्हणण्यानुसार कच्च्या अंड्यामध्ये काही जिवाणू असतात. ते आपल्या शरीरालाल हाणी पोहचवू शकतात.
उकडलेले अंड खाण्याचे फायदे आहेत. जेव्हा उकडलेले अंड खातो तेव्हा आपल्या शरीराला त्यातील सर्वाधिक म्हणजे 90 टक्के प्रथिने मिळतात. याचबरोबर ते पचनासाठीही ते हलके असते. त्याचा त्रास होत नाही त्यामुळे अंड शिजवून खाल्लेले चांगले.
कच्चे अंड खाल्ल्यानंतर त्यातून जीवाणूचा संसर्ग होण्याची भिती असते. अंड्याच्या कवचामध्ये साल्मोनेला नामक जीवाणू असतो. काही लोकांना कच्च अंड खाल्ल्यानंतर उल्टी, जुलाब, ताप येतो. त्यामुळे कच्चे अंडे खाऊ नये. पावसाळ्यात तर अजिबात खाऊ नये. अनेकदा कच्चे अंडे पचायला जडही जाते त्यामुळे तेही आरोग्यासाठी घातक होऊ शकते.
























































