
कोकण हे नाव कोंकण या शब्दातून आलेले आहे. कन्नड मध्ये वायव्य दिशेला कोंकणा (ಕೊಂಕಣ) म्हणतात.
देवनागरी लिपीत कन्नड भाषेतील दिशांची नावे :
1. उत्तर – बडगणा
2. ईशान्य – संकणा
3. पूर्व – मूडणा
4. आग्नेय – कोंगणा
5. दक्षिण – तेंकणा
6. नैऋत्य – वंकणा
7. पश्चिम – पडूवणा
8. वायव्य – कोंकणा
राष्ट्रकूट राज्याच्या काळात त्यांच्या उत्तर पश्चिम दिशेला असणारा विभाग म्हणजे कोंकण.
तामिळनाडू मधील जे कोंग नाडू विभाग आहे, त्याचे ही नाव कन्नड मधून आलेले आहे. आग्नेय दिशा म्हणजे कोंगणा (ಕೊಂಗಣ). पण आता कन्नड भाषेत कोणी दिशा दाखवायला ही नावे वापरत नाहीत. सर्वजण संस्कृत नावे वापरतात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, वायव्य, आग्नेय आणि नैऋत्य.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना मैत्रेय कडकोळ यांनी ही माहिती दिली.
























































