
मालवणी परिसरात दोन हजार किंमतीच्या तब्बल दोन लाखांची रोकड वितरित करायला आलेल्या चौघांना गुन्हे शाखा युनिट-10 च्या पथकाने गजाआड केले. त्या नोटा चलनात आणण्याआधीच पोलिसांनी हस्तगत केल्या.
काही इसम बनावट नोटा वितरित करण्यासाठी मालवणी परिसरात येणार असल्याची खबर युनिट-10 ला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार चार इसम राठोडी मच्छी मार्पेट परिसरात आले. एका ठिकाणी उभे राहून ते संशयास्पद हालचाल करत असताना पोलिसांनी त्यंच्यावर झडप घातली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन हजार किमतीच्या 114 बनावट नोटा सापडल्या. दोन लाख 28 हजार किमतीच्या या नोटा असून त्या चलनात येण्याआधीच पोलिसांनी जप्त केल्या





























































