
सध्या सगळीकडे खरेदीची धामधूम सुरू आहे. ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने लोक खरेदी करत आहेत. या दरम्यान विविध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ऑफर्स देत आहेत. पण, या ऑफर्सच्या नादात कधी कधी भलतंच काहीतरी डिलिव्हर होत असल्याचं निदर्शनाला आलं आहे.
काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवरून एकाने आयफोन मागवला होता. पण, त्याच्या डिलिव्हरी बॉक्समध्ये साबण सापडला होता. आता एका माणसाला सॉक्स ऐवजी ब्रा डिलिव्हर झाली आहे.
या माणसाने ट्विटरवर मिंत्रा या वेबसाईटला टॅग करून तक्रार देखील केली आहे. त्याने मिंत्रावरून फुटबॉलचे स्टॉकिंग्ज मागवले होते. पण, 12 ऑक्टोबर रोजी त्याच्याकडे जे पार्सल आलं त्यात सॉक्स नव्हते.
त्याच्या पार्सलमध्ये सॉक्सऐवजी एक काळ्या रंगाची ब्रा डिलिव्हर झाली होती. त्यावर तक्रार करत या माणसाने आलेली वस्तू बदलून देण्याची मागणी केली. पण, मिंत्राने अंतर्वस्त्र बदलण्यात येत नाहीत. हे सांगून ते बदलून देण्यास नकार दिला.
त्यावर चिडलेल्या या ग्राहकाने ट्विटरवर पोस्ट टाकून आपलं म्हणणं मांडलं आहे. तो म्हणाला की, फुटबॉल स्टॉकिंग्जची ऑर्डर दिली होती. त्याबदल्यात ब्रा मिळाली. मिंत्राची प्रतिक्रिया? माफ करा, बदलून देऊ नाही शकत. आता मी ही ब्रा घालूनच फूटबॉल खेळायला जाणार आहे मित्रांनो, अशी कॅप्शनही त्याने दिली आहे.
त्याच्या या तक्रारीनंतर नेटकऱ्यांनी मिंत्रावर टीका करायला सुरुवात केली आहे. काहींनी त्या मुलीची चिंता केली जिचं पार्सल चुकून आलं होतं. तर काहींनी त्याला तीच ब्रा कापून नीकॅप म्हणून वापरायचा सल्ला दिला.
Ordered football stockings. Received a triumph bra. @myntra‘s response? “Sorry, can’t replace it”.
So I’m going to be wearing a 34 CC bra to football games, fellas. Ima call it my sports bra. pic.twitter.com/hVKVwJLWGr
— Kashyap (@LowKashWala) October 17, 2021



























































