
दोन लसी घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच अशा लसीकरण पूर्ण झालेल्यांना युनिव्हर्सल पास मिळत असून हा पास मॉल तसेच अन्य ठिकाणी प्रवेशासाठी उपयोगी पडत आहे. शिवसेना विभागप्रमुख, आमदार सुनिल प्रभू यांच्या हस्ते दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना अशा उपयुक्त ठरणाऱया युनिव्हर्सल पासचे वाटप करण्यात आले आहे.
लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी उपयुक्त ठरणाऱया युनिव्हर्सल पासचे (स्मार्टकार्ड) मोफत वाटप आज विभागप्रमुख आणि आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते त्यांच्या कुरार मधील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा संघटक प्रशांत कदम, रीना सुर्वे, पुजा चौहान, उपविभाग प्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, ऋचिता आरोसकर, शाखाप्रमुख मनोहर राणे, विजय गावडे, कृतिका शिर्के आदी उपस्थित होते. नागरीकांनी युनिव्हर्सल पासचे मोफत स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी रोज सायंकाळी 6 ते रात्रौ 8.00 वाजे पर्यंत कुरार येथील तानाजी नगर, ओम कुराराबाद बिल्डिंग येथील आमदार सुनिल प्रभू यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा अशी माहिती विधानसभा संघटक विष्णू सावंत आणि प्रशांत कदम यांनी दिली आहे.


























































