सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धनत्रयोदशीपूर्वीच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. बुधवारी मल्टी कमोडिटीवर (एमसीएक्स) सोन्याच्या किमतीत 0.10 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली. या घसरणीनंतर सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 47 हजार 765 रुपयांवर पोहोचला आहे.

गतवर्षी याच दिवशी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 51 हजार 79 रूपये इतका होता. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीबाबत काहीसा हात आखडता घेतला होता. मात्र सध्या दिवाळीच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे सोन्याचा दर कमी झालेला असतानाच दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदी 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 65050 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे त्याचा चांदीच्या खरेदीवर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.