सेक्स करायला नकार दिला म्हणून पिक्चरमधून हाकललं! अभिनेत्रीचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड आणि कास्टिंग काऊच हे नातं काही नवीन नाही. बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी आजवर वेगवेगळ्या पद्धतीने याबाबत खुलासे केले आहेत.

आता अजून एका अभिनेत्रीची त्यात भर पडली आहे. जन्नत 2 या चित्रपटातून पदार्पण केलेली अभिनेत्री इशा गुप्ता हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

एका मुलाखतीत ती म्हणाली की, बॉलिवूडमध्ये उमेदवारीच्या दिवसांत मी एका मेकअप आर्टिस्टसोबत रूम शेअर तत्वावर राहत होते. मी नवीन असल्याने एकटं राहायची भीती वाटते, असा बहाणा मी केला होता. पण, वास्तविक मी एका माणसाला घाबरत होते. तो माणूस प्रसिद्ध निर्माता होता.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

त्याने मला त्याच्यासोबत सेक्स करण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी ती धुडकावून लावली. त्यामुळे त्याने मला त्याच्या चित्रपटातून हाकललं होतं. त्यांच्यासोबत पाच दिवसांचं चित्रीकरण देखील झालं होतं. पण, फक्त त्यांच्यासोबत सेक्स करायला नकार दिल्याने मला चित्रपटातून बाहेर काढलं, असं इशा या मुलाखतीत म्हणाली आहे.


View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

तुम्ही जेव्हा या इंडस्ट्रीच्या बाहेरचे असता, तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. निर्माता दिग्दर्शक अशाच उमेदवारांचा गैरफायदा घेतात, असंही ती यावेळी म्हणाली आहे.