
दापोली तालुक्यातील दाभोळ गावात एस.टी. स्टॅंड व दाभोळ धक्का परिसरात 10 कावळे मृतावस्थेत आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतावस्थेतील कावळे निदर्शनास दिसल्याने गावकऱ्यांनी याबाबत दाभोळ ग्राम पंचायतीजवळ संपर्क साधला. ग्राम पंचायतीने दापोली तालुका पशु वैदयकिय खात्याला कळविले असून सबंधित खात्याकडून काळे यांनी घटनास्थळाला भेट देवून मृत कावळे शवविच्छेदनासाठी दापोली येथे नेले आहेत.
कावळ्यांचा मृत्यू कशाने झाला असावा याबाबत दापोलीचे पशुवैदयकिय उपायुक्त डॉ. मुकूंद लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विषबाधा झाल्याने कावळे मृत झाल्याचे सांगितले. ब त्यामुळे दाभोळकरांनी घाबरून जावू नये असे आवाहन लोंढे यांनी सांगितले आहे.



























































