
>> संजय बुधवंत
आपल्या वास्तूची अंतर्गत रचना ही ऊर्जा सिद्धांत व पंचमहाभूते यांना अनुरूप असावी. त्यामुळे व्यक्ती व समष्टी (Universe) यांच्यात एकरूपता निर्माण होऊन वैश्विक शक्तीच्या सकारात्मक स्पंदन लहरींचा आशीर्वाद प्राप्त होतो. आवासाच्या, वास्तूच्या ब्रह्मस्थानात केंद्रस्थानात उभे राहून कंपासने वास्तूच्या प्लॅनवर (Drawing) 360 मध्ये दिशांची नोंद करावी, चार मुख्य दिशा व चार उपदिशा याबरोबरच धरती व आकाश यांना जोडणारे ब्रह्मस्थान अशा दशदिशांचा विचार करावा. ब्रह्मस्थान मोकळे असावे व त्यात कोणतेही जडत्व निर्माण होणाऱया गोष्टी नसाव्यात. ते स्वच्छ व टापटीप असावे. उत्तरेच्या अक्षापासून पूर्वेच्या अक्षापर्यंत प्रदक्षिणा मार्गाने गेल्यास हा जलप्रभाग आहे. हा अत्यंत प्रकाशमय, खेळती हवा असणारा, मोकळा-हलका असा प्रभाग असावा. येथे मोठय़ा खिडक्या असाव्यात. येथे बैठकीची खोली, हॉल उत्तम ठरतात.
पूर्वेच्या अक्षापासून दक्षिणेच्या अक्षापर्यंतचा प्रभाग अग्नितत्त्वाचा प्रभाग आहे. येथे किचन असणे सर्वोत्तम आहे. दक्षिणेच्या अक्षापासून पश्चिमेच्या अक्षापर्यंत पृथ्वीतत्त्वाचा प्रभाग आहे. येथे कर्त्या व्यक्तीचे शयनगृह साठ वर्षांखालील असावे. पश्चिम ते उत्तर यांमधील वायुतत्त्व प्रभागामध्ये मुलांचे व अतिथीसाठींचे शयनकक्ष असावे. संगीत, कला व खेळ यांसाठी सर्वोत्तम आहे. अभिजित प्रतिष्ठान ही संख्या, विशिष्ट वास्तुशास्त्र्ा, वास्तुज्योतिष, जोतिषशास्त्र्ा यांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण देणारी व संशोधन करणारी मुंबईस्थित अग्रगण्य संस्था आहे.



























































