मतदार याद्या अपडेट करण्याचे काम सुरू, नव्या मतदारांना नाव नोंदवण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादी अपडेट केली जात असून 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्य़ांना त्यांच्या विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवता येणार असून नाव पत्त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे तर 20 डिसेंबरपर्यंत मतदार यादीशी संबंधित दावे निकाली काढले जाणार असून 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मुंबईतील सर्व नागरिकांना या मतदार यादी संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाची माहिती व्हावी व अधिकाधिक प्रमाणात मतदार नोंदणी, नावातील दुरुस्त्या व्हाव्यात याकरता महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या माध्यमातून विविध माध्यमांचा उपयोग करुन मतदार नोंदणी जनजागृती करण्यात येणार आहे. 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत मुंबईतील प्रमुख ठिकाणी तसेच प्रमुख रेल्वे स्थानके, दवाखाने, उद्याने, विमानतळ इत्यादी वर्दर्ळीच्या ठिकाणी मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स लावण्यात येत आहेत. विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाजयांच्या बैठकांचे आयोजन करुन त्यांना सांगण्यात येणार आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर मतदार नोंदणी कार्यक्रमाची महानगरपालिकेचे सर्व करदाते, व्यवसायिक व नागरिक यांना माहिती होईल, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नाव नोंदणी करा

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्य होईल तेथवर मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी पेंद्रीय निवडणूक आयोगाची www.nvsp.in  आणि  www.ceo.maharashtra.nic.in ही संकेतस्थळे उपलब्ध आहेत तसेच चौकशीकरता 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मुंबईतील सर्व संबंधित नागरिकांनी, 1 नोव्हेंबर 2021 रोजी भारत निवडणूक आयोगातर्फे प्रसिद्ध होणाऱ्य़ा विधानसभेच्या प्रारुप मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असल्याची खात्री करुन घ्यावी. नाव नसेल तर नावाची नोंदणी करावी. चुकीचे नाव व पत्ता असेल तर दुरुस्ती करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.