शृंगारपर्वाचा देखणा साज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

झगझगीत, पैठणी नेसून नथ सावरत ठेवणीतले सुवर्णालंकार घालून खऱया अर्थानं शृंगारित ललना आनंदानं हसत लाडू, करंज्या. शंकरपाळे, चिवडा घेऊन घरातल्यांना, शेजाऱयांना देत लगबगीनं जात-येत असतात. दिवाळी हा खऱया अर्थाने हर्षोल्लास व शृंगाराचा सण. वर्षभर गुराढोरासारखं राबून चाकरमानी लोकपण हा सण साजरा करायला तयवरत असतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळणी करायला येते. नात्यांचा मधूर उबदारपणा या दिवसा काही औरच असतो. प्रत्येक दिवसाचा भाव वेगळा. प्रत्येक दिवसाचा शृंगार वेगळा!

तिसरा रस आहे शृंगाररस! तसे शृंगारचे दोन अर्थ आहेत. शृंगार म्हणजे नटणे-स्त्र्ायांचा आवडता उद्योग! आणि दुसरा अर्थ आहे शृंगार म्हणजे प्रणय!
कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ यामध्ये ते म्हणतात,

‘नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे!’

पण आपण शृंगारचा अर्थ सजणे, नटणे यापुरताच घेऊयात. खूप काळानंतर या दिवाळीत शृंगाराचे महत्त्व जास्तच आहे. कोरोनाच्या काळ्याकभिन्न मृत्यूच्या काळोखातून आपण दीपावलीच्या उज्ज्वल उजेडाकडे आलोय. भयाच्या सावल्या मागं सरल्यावर सर्वच स्त्र्ायांच्या तोंडावर हास्याचा दागिना असल्यावर नटण्याचा, सजण्याचा मोह तर होणारच ना! बंद पडलेली दुकानाची तोंडं भरभरून हसून उघडलीत. स्त्र्ायांचे दागिने, सजण्याची नानाविध नवनवी साधनं-अलंकार… ते बघता बघता निरखता स्त्र्ायांचे चेहरे डोळे कसे हिऱयासारखे चमचम करतात!
शृंगार स्त्र्ायांपुरता मर्यादित नाही हं; या दिवसात घराला पण शृंगार हवा असतो! आणि आजी-आजोबा, मम्मी- डॅडीपासून छोटय़ापर्यंत सगळे झाडून कामाला लागतात. घराचा शृंगार करण्यात कुणीच मागे नसते. कोळिष्टकं जळमटं झटकली जातात. रंगरंगोटी भिंतींच्या तोंडावर चमकू लागते. दिव्यांची तोरणं, फुलांच्या माळा, दारापुढे रांगोळ्या मंद पण तेजाळ पणत्यांची रांग शांतपणे तेवत राहते. किती सुंदर दिसतात ती घरं – आकाशकंदील वेगवेगळ्या आकारातले, रंगातले झळकतात. सर्वत्र दिव्यांचा हर्षभरीत लखलखाट – रात्री तर आकाशात चांदण्यांना व चंद्रालापण ईर्षा वाटावी अशी नेत्रदीपक रोषणाई! रंगीत प्रकाश शंलका-आकाशामध्ये तर जमिनीवर भुईचक्र, पाऊस, फटाके, फुलबाज्या किती प्रकार!

झगझगीत, पैठणी नेसून नथ सावरत ठेवणीतले सुवर्णालंकार घालून खऱया अर्थानं शृंगारित ललना आनंदानं हसत लाडू, करंज्या. शंकरपाळे, चिवडा घेऊन घरातल्यांना, शेजाऱयांना देत लगबगीनं जात-येत असतात. दिवाळी हा खऱया अर्थाने हर्षोल्लास व शृंगाराचा सण. वर्षभर गुराढोरासारखं राबून चाकरमानी लोकपण हा सण साजरा करायला तयवरत असतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळणी करायला येते. नात्यांचा मधूर उबदारपणा या दिवसा काही औरच असतो. प्रत्येक दिवसाचा भाव वेगळा. प्रत्येक दिवसा शृंगार वेगळा! जसे नवरात्रीच्या नऊ दिवसांचा प्रत्येक रंग वेगळा तसे चार दिवसांचे चार शृंगारपट वेगळे असायला हवेत खरं! पहिला दिवस सोन्याचे दागिने, दुसऱया दिवशी चांदीचे, तिसऱया दिवशी मोत्यांचे, चौथ्या दिवशी प्रसन्न ताज्या फुलांचे दागिने! या शृंगार सणाला साजेशी हवा पण प्रसन्न गार असते. थंडगार हवेत पहाटेच्या शांत प्रसन्न झुळूका हळद-चंदनाचं उटणं लावून गरम गरम पाण्यानं अंघोळ हा शृंगाराचा प्रथम चरण. नव्या कोऱया कपडय़ांचा मोहक गंध आणि स्वयंपाकघरातून येणारा खमंग फराळाचा घमघमाट सारं वातावरण रंगरूप रसगंध यानं भारावलेलं.

तसं पाहिलं तर चराचरातली प्रत्येक गोष्ट शृंगाररसानं भरलेली आहे. झाडांकडे पाहा… अमलतासची पिवळीधमक झुंबर- गुलबक्षीचा रंगतदार तोरा – गुलमोहर तर लालचुटूक रंगाची वैभव मिरवत प्राजक्ताची नाजूक फुलं मंदिरया निरांजनाचं पावित्र्य घेऊन तेवत फुलत राहतात, तर सृष्टीतले इतर सजीव बांधव पशुपक्षी यांना तर निसर्गानं शृंगार जन्मतःच उधळून दिलाय!
मोराचा सप्तरंगी इंद्रधनुषी पिसारा, सिंहाची लहरेदार आयाळ, पक्ष्यांच्या आवाजातली मधूर सूरमयी किणकिण… किलबिल… माशांचे डोळे दिपवणारे रंग काही पारदर्शक तर काही विजेगत चमकणारे फुलांसारखे जेलीफिश…

सजीवांचं सोडाच, पण दगडांमध्येसुद्धा काही दगडांमध्ये कोनफळी रंगाचे हिऱयागत चमचम स्फटिक, चीनमधले सप्तरंगी पर्वतांची रांग – समुद्री वाऱयानं कोरलेल्या शिल्यानं नटलेली गुहा, भव्य डोंगराचे वलयदार आकार, किती वैविध्य! संपूर्ण सृष्टीचं एका अभूतपूर्व शृंगाराचं विलोभनीय रसायनं. नटायला, सजायला कुणाला आवडत नाही. अगदी पुरुषच जरा त्यात बिच्चारे असतात. येऊन जाऊन चेन, अंगठी एवढेच अलंकार ते घालू शकतात, पण त्यापलीकडे जाऊन उमदं मन चांगले विचार शौर्य न असहाय्य जिवांना धीर आधार देणारे मजबूत बाहू हेच अलंकार अजोड अमूल्य असतात! याच संदर्भातली गोष्ट आठवली. सदराचं नावचं मुखवटे सोलताना आहे, लेखकाचं कामच आहे ते! तर लिओ टॉळस्टाम या जगद्विख्यात लेखकाने लिहिलेली एक अप्रतिम गोष्ट आहे. त्याचे नावच आहे, ‘शापित संगीत.’ तर या कथेमधला वाटसरू दुसऱयाला म्हणतो, बायका? तू त्यांना गृहित धरू नकोस. जेव्हा त्यांना कळलं की, आपण त्यांना भोग्यवस्तू समजतो… तेव्हा त्यांनी म्हटलं, ‘अस्सं… ठिकाय् तर आम्ही तेच होतो न् वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला ठेवतो.

(सॉरी हे माझे शब्द पण लिओ हे वेगळ्या शब्दांत लिहितो परत त्यात अनुवाद पण अर्थ हाच!)

न मग पहा पुरुषांच्या पिढय़ान्पिढय़ा काय करतात?

त्यांना आनंदी राहण्यासाठी सुखसोयीयुक्त राहण्यासाठी त्यांचे अलंकार, कपडे, दागिने घडवण्यासाठी पुरुषाच्या पिढय़ान्पिढय़ा राबल्या. त्यांच्या पर्सेस, चपला, फरचे गाऊन (सुंदर त्यांनी दिसावं यासाठी सर्व सामान असं हे सर्व करताना पुरुषच राबला) असा वचपा काढला त्यांनी! याचा सरळ अर्थ असा होतो की, शृंगार म्हणजे फक्त प्रणयासाठी आम्हाला वापरणार असलात तर आम्हीही तुम्हाला वापरू, गुलाम करू. तुम्हाला न कळता! म्हणजे पुरुष याच गोड समजुतीत आहे की, बायका आमच्या गुलाम आपल्या ताब्यात! असे न होता पुरुषच बायकांचे गुलाम न बायकांच्या ताब्यात आहेत. सकृतदर्शनी पहा सोशिक सून हीच नंतर कजाग सासू बनत घराचा ताबा घेते. म्हणून तर सासू खास हा शब्द पडला.

थोडासं विषयांतर झाले खरं, पण खरा शृंगार पशुपक्षीय करतात. पहा माणसांमध्ये बायका सुंदर असतात, तर पशुपक्ष्यांमध्ये नर सुंदर. नराला कमालीची प्रणयाराधना म्हणजे शृंगारपर्वाचा प्रथम अर्थ पूर्ण करावाच लागतो. त्यात नाच पिसारा पंख फुलवलं, घरटी पूर्ण कलात्मक पद्धतीनं बांधणे या सगळ्या गोष्टी येतात. इतके कष्ट मला वाटतं मानवजगातले पुरुष पण घेत नाहीत! उलट त्यांच्याच अपेक्षा असतात. सुगरण स्वेटर वीणणारी, सगळे सहन करणारी थोडक्यात म्हणजे न मारणारी अशी म्हैस हवी असते गोठय़ात बांधायला! तर हे कुणीच मान्य न करता बायका मस्त शृंगार करून आपल्याला हव्वं ते बरोब्बर पुरुषांकडून घेतात. पहा पक्ष्यांमध्ये पण घरटी, चारापाणी आणणे हे नरच करतात. या घरटय़ांना पण शृंगारतात. चक्क मऊ कापूस, मऊ पानं शिंपिण पक्षी सुगरण बायापक्षी यांचा घरटी पाहिली तर कळतं की, घराला नटवणं हे करण्यात पक्षी पण मागे नाहीत. शेवटी शृंगार फक्त देहाचा नाही. घराचा, मनाचा न् विचारांचा पण असतो. तो नेटका झाला तर सुंदर नाहीतर विचका!

– [email protected]