शिवराम सदनमध्ये दीपोत्सव साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवीमधील शिवराम सदन चाळीत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दीपोत्सव आयोजित करण्यात आला. श्री साई दरबार दिव्यांनी प्रकाशित करून दीपोत्सवाची सुरुवात झाली. चाळीतील सर्वांनी तिरंग्याचे कंदील लावून देशाप्रती प्रेम व्यक्त केले. चाळीतील लहान मुलांनी नृत्याचा कार्यक्रम सादर केला. गायक दिलीप गोळपकर यांनी सुमधूर गीते सादर केली. रहिवाशांसाठी ठिपक्यांच्या रांगोळीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्पर्धेचे परीक्षक आणि प्रसिद्ध रंगावलीकार चारुदत्त वैद्य यांनी प्रात्यक्षिक सादर केले.