
झुंजार पत्रकार, ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव स्मृती पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी विख्यात मनोविकार तज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांची झालेली निवड अनेक अर्थाने उचितच म्हणावी लागेल. गत तिसेक वर्षांपासून पत्र महर्षी अनंतरावांच्या स्मृती पुरस्कार साहित्य, कला, संस्कृती, पत्रकारिता, संगीत, नाटक, सामाजिक कार्य या क्षेत्रांत लक्षणीय कार्य करणाऱया मान्यवरांना समारंभपूर्वक प्रदान केला जातो. 14 नोव्हेंबर रोजी अनंतराव स्मृती पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण नाडकर्णी यांना केले जाणार आहे.
अनंतरावांच्या नावे ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे एकूण व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी आहे. मनोविकार तज्ञ, विचारवंत आणि लेखक अशी त्यांची महत्त्वाची ओळख असली तरी त्यांच्यात एक शैलीदार लेखक, कवी, नाटककार, गीतकार, संगीतकार, तबला वादक, मर्मज्ञ, संगीतप्रेमी, सूत्रसंचालक आणि तत्त्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक अशीही त्यांना बहुपदरी ओळख लाभलेली आहे. एक गोष्ट मात्र यात आवर्जून अधोरेखित केली पाहिजे ती म्हणजे त्यांचा कार्यबेस हा मानसशास्त्र्ा हाच राहिलेला आहे. तोच त्यांच्या कार्य प्रवासाचा ध्यास राहिला आहे. असाच ध्यास डॉ. आनंद यांनी घेतला. त्यांचा जन्म सुशिक्षित, संवेदनशील अशा कुटुंबात झाला. असे असले तरी डॉ. आनंद यांना लहानपणीच पोलिओ आजाराचा सामना करावा लागला. संघर्षाशी मुकाबला करण्याचे धैर्य खरे तर त्यांना लहाणपणापासूनच लाभले आणि त्याचसोबत त्यांना उत्तम प्रतिभा, तीक्र संवेदनाशिलता व सकारात्मकतेची दैवजात देणगी लाभली आणि त्याच पूर्वसंचिताच्या बळावर त्यांची पुढील काळात वाटचाल होत गेली. नाडकर्णी यांची एम. डी. ही मनोविकार शास्त्र्ाात आहे. मनोविकाराबद्दलच्या गैरसमजुतीविरुद्ध चळवळ उभारण्याची कल्पना त्यांच्या मनात वैद्यक शाखेचे विद्यार्थी असल्याच्या काळात म्हणजे 1984 साली आली. मनोविकार शास्त्र्ााचे शिक्षण घेत असताना संघटना, संस्था बांधणीचे विचार त्यांच्या मनात आले. त्यानुसार त्यांनी ठाणे येथे 23 मार्च 1990 साली आपल्या निवडक, विश्वासू सहकाऱयांच्या मदतीने आय.पी.एच. अर्थात इन्स्टिटय़ूट फॉर सायकालॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना केली. तीक्र मानसिक आजारावर उपचार एवढय़ापुरतेच या संस्थेचे कार्य सीमित नव्हते, तर उपचारासाठी रुग्णालयात येणारे मनोरुग्ण, त्यांचे कुटुंबीय, दैनंदिन प्रश्नांमुळे गाजलेली व्यक्ती, कोणत्याही समस्या नाहीत; मात्र मानसशास्त्र्ााrय ज्ञानाचा उपयोग स्वविकासासाठी करू इच्छिणाऱया व्यक्ती अशा सर्वांची ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रुढ मार्गासोबतच साहित्य, कला, संस्कृती, संगीत, नाटय़, चित्रसंवाद अशा आनंददायी साधनांचा कल्पकतेने या संस्थेत उपयोग केला जातो. नाडकर्णी यांच्या संस्थेत 60 मनोविकार तज्ञ, मानसशास्त्र्ाज्ञ, समुपदेशक, पंचवीस आभार सदस्य, विविध सेवाभावी संस्थांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. शिवाय संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र्ा विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. डॉ. नाडकर्णी आपल्या संस्थांच्या माध्यमातून सर्व वयोगटासाठी सेवाभावी उपक्रम राबवतात. या कार्यासाठी त्यांना डॉ. शुभदा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी यांच्यासारख्या मानसशास्त्र्ाज्ञांची मजबूत साथ मिळत असते. डॉ. नाडकर्णी हे पुण्याच्या मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या ‘गद्दे-पंचविशी व विषाद योग’ या पुस्तकाचा राज्य पुरस्काराने सन्मान झाला. रंग माझा वेगळा, असेच आम्ही सारे ही त्यांची गाजलेली व्यावसायिक नाटक सांगता येतील. ‘मयसभा’ या नाटय़ लेखनासाठी मिफ्ता सन्मान लाभला. त्यांचे मूळ लेखन असलेल्या ‘गेट वेल सून’चे नाटय़ रूपांतर प्रशांत दळवी यांनी केले. त्या नाटकाची निवड ही सवोत्कृष्ट पहिल्या दहा नाटकांत झाली. डॉ. नाडकर्णी हे वयम आणि आयपीएचचे कार्यकारी विश्वस्त असून, लहान मुलांसाठी त्यांची संस्था बहुरंगी बहार, सातवी ते नववीमधील मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते. त्यांच्या साहित्य संपदेचा सन्मान राज्य शासन, मसाप, साहित्य संस्कृती मंडळ यांच्या पुरस्काराने झाला आहे. एवढेच नाही तर ते त्या वैद्यक क्षेत्रात काम करतात त्याचाही सन्मान विविध पुरस्कारांनी झाला आहे. पत्र महर्षी अनंत भालेराव पुरस्काराने त्यांचे लेखन व कार्य पुन्हा नव्याने अधोरेखित झाले आहे.
- प्रशांत गौतम

























































