डॉ. सुनील पोखरणा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवप्रकरणी अटकेच्या शक्यतेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत तात्पुरता दिलासा दिला आहे. याप्रकरणी 17 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून, पोलिसांना म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात डॉ. पोखरणा यांना अटक करण्यासाठी कोणतेही कारण सध्या दिसून येत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

चौघांच्या जामिनावर उद्या सुनावणी

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी दाखल गुह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी शिंदे यांच्यासह स्टाफ नर्स शेख, पठारे व चन्ना यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले असून, या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.