
आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास एनसीबीच्या विशेष पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला होता. परंतु त्यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास एसआयटीकडून केला जाणार आहे. अन्य तीन प्रकरणांमध्ये कोणतेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आढळलेले नाही असे एसआयटीने स्पष्ट केले आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील अधिकाऱयांचे विशेष चौकशी पथक या प्रकरणांचा नव्याने तपास करत आहे. ती सहा प्रकरणे मुंबई एनसीबीकडूनच वर्ग करण्यात आली होती. परंतु त्यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास एसआयटी करणार आहे. त्यात आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणाचा समावेश आहे. मुंब्रा येथील एमडी ड्रग्ज प्रकरण, जोगेश्वरी येथील चरस प्रकरण आणि डोंगरी येथील एमडी ड्रग्ज प्रकरण अशी अन्य तीन प्रकरणे एसआयटीने सोडली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.



























































