
ओडिसा येथून सागवान जातीचा माल घेऊन गुजरातकडे निघालेल्या ट्रकचा गोंडपिपरी येथिल तलावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात चालकाला किरकोळ इजा झाली आहे. अपघात झालेल्या ट्रकमधील सागवान माल तस्करीचा असावा, अशी शंका पोलिसांना होती. मात्र चालकाकडे ट्रक मधील सागवान मालाचे कागदपत्रे होती.
दरम्यान, ट्रकमधील सागवन विदेशातील उच्च प्रतिचे असून आपल्याकडे या जातीचे सागवान वृक्ष नसल्याची माहीती वनपरिक्षेत्राधिकारी बोबडे यांनी दिली.
























































