टी-20 क्रिकेटने गोलंदाजांना ‘बॉलिंग मशीन’ बनवलेय, महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर इयान चॅपेल यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटमधील पूर्वीची नजाकत आणि गोलंदाजीत कौशल्य दाखवण्यापेक्षा हाण चेंडू आणि पाठव स्टेडियममध्ये अशी अजब स्पर्धा लागलेली दिसतेय. टी-20 या हाणामारीच्या झटपट क्रिकेटने तर गोलंदाजांना चक्क ‘व्हर्च्युअल बोलिंग मशीन’ बनवले आहे. कारण छोटी मैदाने आणि हायटेक बॅट्स यांच्या बळावर फलंदाजी गोलंदाजीवर वरचढ होऊ लागली आहे, अशी खंत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटर इयान चॅपेल यांनी एका क्रिकेट वेबसाइट लिहिलेल्या आपल्या स्तंभलेखात व्यक्त केली आहे.

टी-20 लढतीत बॅट चेंडूला लागली की तो सीमारेषेपार हवेतून स्टॅण्डमध्ये जातो. खरे तर एक सामान्य फटका फलंदाजाला षटकार मिळवून देतो. हे पाहिल्यावर गोलंदाजांचा तिळपापड होत असेल. पण छोटे मैदान आणि सुधारित बॅटमुळे फलंदाज या प्रकारात ‘शेर’ बनले आहेत. ही असमान स्पर्धा वाटते. क्रिकेटच्या प्रशासकांनी यात सुधारणा घडवून क्रिकेटचा मूळ काwशल्याचा गाभा सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन इयान चॅपेल यांनी केले आहे.

नाणेफेक जिंका आणि लढत जिंका याला विश्वचषक स्पर्धा म्हणायचे का ?

यंदाची आखातातील छोटय़ा मैदानांवरील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हणजे गोलंदाजांचे पंबरडे मोडण्याचाच प्रकार होता. नाणेफेक जिंका आणि समोरच्या संघाने ठेवलेले धावांचे आव्हान हाणामारीने पार करा याला विश्वचषक क्रिकेट म्हणायचे का, असा संतप्त सवाल करीत चॅपेल म्हणाले, क्रिकेटमध्ये रंगत आणण्यासाठी क्रिकेटच्या मूळ गाभ्याला धक्का लावणे मला तरी पटत नाहीय. कारण क्रिकेट हा फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समान सामना असायला हवे. अन्यथा या खेळातील मजाच काही दिवसांनी निघून जाईल. चेंडू बॅटने हाणा, पण ते करताना तुमच्यातील फलंदाजीचे काwशल्य दिसायला हवे. अंदाजाने चेंडू ठोकायचा आणि चौकार-षटकार मिळवायचे यात मला तरी मजा वाटत नाही, असेही चॅपेल शेवटी म्हणतात.