रत्नागिरी जिल्ह्यात 13 लाख 60 हजार 304 जणांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लसीकरण सध्या वेगाने सुरु असून आतापर्यंत 13 लाख 60 हजार 304 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये 9 लाख 37 हजार 905 जणांनी पहिला डोस आणि 4 लाख 22 हजार 399 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जानेवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाविरोधी लसीकरणाची सुरुवात झाली. पहिल्या टप्यात फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे अनेकवेळा नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले होते. त्यानंतर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. जिल्ह्यामध्ये कोविशिल्डचा पहिला डोस 8 लाख 1 हजार 079 जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस 3 लाख 1 हजार 497 जणांनी घेतला आहे. कोवॅक्सीनचा पहिला डोस 1 लाख 36 हजार 826 जणांनी तर दुसरा डोस 1 लाख 12 हजार 902 जणांनी घेतला आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेण्याचे प्रमाण 86.69 टक्के आहे. तर दुसरा डोस घेण्याचे प्रमाण 39.4 टक्के आहे. लसीकरणाने वेग घेतल्याने जिल्ह्यात आज कोविडचा एकही रुग्ण नाही.

अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात कोविडचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही शून्य आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 79045 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 76517 जण बरे झाले. मृत्यू झालेल्यांची संख्या 2484आहे. सध्या 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.