
‘झिम्मा’ हा मराठी चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल आहेत. विकेंडला ठाण्यातील मल्टिप्लेक्समध्ये ‘झिम्मा’चे 18 शोज लागले होते आणि तेसुद्धा सगळे हाऊसफुल्ल.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘झिम्मा’चे लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.



























































