चंद्रपूर – ग्रामपंचायत कार्यालयातच ‘झूम बराबर, झूम शराबी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामपंचायतेतून गावविकास साधला जातो. गावकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातात. मात्र सखरवाही ग्रामपंचायतेत मात्र भलतचं काही सूरू होतं. चक्क ग्रामपंचायतेचा कार्यालयात बसून दारूचा प्याला रिचविण्याचा मुक्त कार्यक्रम केला जायचा. अन रिकाम्या बाटल्या शौचालयात लपविल्या जायच्या. हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी उघळकीस आणला आहे.

हा प्रकार पुढे येताच गावकऱ्यांनी कपाळावर हात ठेवला. या प्रकाराची माहीती खापनेनी गट विकास अधिकारी चंद्रपूर यांना दिली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी बोलताना सरपंच नागेश बोंडेनी असा प्रकार घडला नसून, हा माझ्याविरोधात षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यापासून लपून घसा ओला करण्याचे प्रकार तसे बंदच झालेत. अशात चक्क सभागृहातच ” झूम बराबर झूम शराबी ” कार्यक्रम उघळकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.