
राज्यातील कोरानाची रुग्णसंख्या घटू लागल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटने धुमाकूळ घातला असताना राज्य सरकारनेही नागरिकांच्या मुक्त संचाराला आळा घालण्यासाठी दोन्ही डोसची अट लागू केली आहे. यामुळे आता सार्वजनिक वाहनांपाठोपाठ रिक्षा, टॅक्सीसह सर्व खासगी वाहने तसेच दुकाने, हॉटेल्समध्ये दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तसे न झाल्यास संबंधित ग्राहक ंिकंवा प्रवाशाला 500 रुपये तर वाहन तसेच आस्थापनाच्या मालकाला 10 हजार रुपये दंड ठोठवण्याची तरतूद नव्या निर्बंधांत केली आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन निर्बंधांत वाहनांबरोबरच सार्वजनिक कार्यक्रमांतही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. तिकीट असलेल्या किंवा नसलेल्या कार्यक्रमासाठी येणाऱया अभ्यागत, पाहुणे, ग्राहक तसेच आयोजकांचे संपूर्ण लसीकरण केलेले असावे.
समारंभांत 50 टक्के उपस्थिती
चित्रपटगृह, नाटय़गृह, मंगल कार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱया कोणत्याही कार्यक्रमाला 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. मोकळ्या जागेतील संमेलने तसेच अन्य कार्यक्रमांना 25 टक्के उपस्थिती.
z संमेलन, मेळाव्यास उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या एक हजारापेक्षा अधिक असेल तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास स्थानिक प्रशासनाला कार्यक्रम बंद करण्याचे अधिकार आहेत.
जिल्हा व्यवस्थापनाला विशेष अधिकार
कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती 48 तासांची पूर्वसूचना देऊन वाढविता येतील. परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र जाहीर नोटिसीद्वारे 48 तासांची पूर्वसूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही.
वेळेचे निर्बंध उठवले
नवीन नियमावलीनुसार आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच अन्य सर्व बाबींसाठी असलेली कोरोनाकाळातील वेळेची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. कोरोना निर्बंधांआधी जी सर्वसामान्य वेळ स्थानिक प्रशासनाने ठरवली असेल त्यानुसारच सर्व गोष्टी सुरू राहतील.
वानखेडेवर 25 टक्केच प्रेक्षक
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 3 डिसेंबरपासून होणाऱया कसोटीसाठी प्रेक्षक संख्या 25 टक्के ठेवावी लागणार आहे. मात्र या सामन्यासाठी 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार बैठक
ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे देशात आणि महाराष्ट्रात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी संपूर्ण प्रशासन व आरोग्य विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे सध्यातरी चिंता करण्याचे कारण नाही. फक्त सतर्क राहावे लागेल, असे टोपे म्हणाले.
युनिव्हर्सल पास, ओळखपत्र बंधनकारक
z राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. त्याचप्रमाणे छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र व कोरोना प्रमाणपत्रदेखील वैध पुरावा मानला जाईल.
z 18 वर्षांपेक्षा कमी वय असल्यास शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र तसेच वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.
लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी करणाऱयांनाच महाराष्ट्रात प्रवेश
राज्यात येणाऱया सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर संपूर्ण लसीकरण असेल किंवा 72 तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणीचे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश दिला जाईल.
रुमालाला मास्क समजले जाणार नाही
नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. रुमालाला मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल.
असा होईल दंड
n कोविड नियमांचे पालन न करणाऱया व्यक्ती तसेच संस्था, आस्थापना दंडास पात्र असतील. नियमाचे पालन न करणाऱया व्यक्तीस रुपये 500 दंड करण्यात येईल. संस्था, आस्थापनेच्या परिसरात एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास त्या संस्थेस 10 हजार रुपये दंड करण्यात येईल.
n संस्था, आस्थापना यामध्ये हॉटेल, दुकाने तसेच अन्य संस्थांचाही समावेश आहे.
n जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच नियमात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रुपये 50 हजार इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास संस्था बंद करण्यात येईल.
n वारंवार कसूर केल्यास कोरोनाची अधिसूचना अमलात असेपर्यंत मालक, एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा नोंदणी रद्द करण्यात येईल.
n टॅक्सीमध्ये किंवा खासगी वाहतूक करणाऱया चारचाकी वाहनात कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेला प्रवासी आढळल्यास त्या प्रवाशाला 500 रुपये दंड. संबंधित वाहनचालकाला 500 रुपये दंड तर बसमालक असल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.































































