श्नेडर इलेक्ट्रिकचा ग्रीन योद्धा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

व्यापारी संस्था, उद्योग आणि व्यक्तींनी एकत्र येऊन पर्यावरणरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी श्नेडर इलेक्ट्रिकने ‘ग्रीन योद्धा’ उपक्रमाची सुरुवात केली. 2021 ते 2030 या कालावधीमध्ये देशात अंदाजित कार्बन उत्सर्जन 1 बिलियन टनांनी (जीटी) कमी करेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीओपी26 मध्ये केली होती. या पार्श्वभूमीवर सिमेंट, लोखंड आणि स्टील, व्यावसायिक आणि औद्योगिक इमारती, अ-धातू खनिजे आणि रसायननिर्मिती या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या क्षेत्रांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे हे सामायिक लक्ष्य साध्य करण्यासाठीच्या या प्रयत्नांत सामील व्हावे, असे आवाहन श्नेडरइलेक्ट्रिकने केले आहे.