सिंधू बाद फेरीत; श्रीकांत पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती आणि हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी ‘अ’ गटातील दुसऱया लढतीत जर्मनीच्या यवोनी ली हिचा सरळ गेममध्ये पराभव करून वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली. मात्र  दुसरीकडे पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे 2018 मध्ये विजेतेपद पटकाविलेल्या 26 वर्षीय पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानी असलेल्या यवोनी ली हिचा 21-10, 21-13 असा अवघ्या 31 मिनिटांत फडशा पाडून आगेकूच केली. आता अखेरच्या गट लढतीत सिंधूपुढे थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिचे आव्हान असेल.

या स्पर्धेच्या 2014 मधील हंगामात बाद फेरी गाठणाऱया 14 व्या मानांकित किदाम्बी श्रीकांतला यंदा बाद फेरी गाठण्याच्या आशांना सुरुंग लागला. ‘ब’ गटातील दुसऱया लढतीत त्याला  पराभूत व्हावे लागले.