ट्विटरवर रेड रिबीन इमोजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटरने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून #ThereIsHelp नोटिफिकेशन सेवेचा विस्तार केला आहे. या नोटिफिकेशनवर आता एचआयव्ही/एड्सची संबंधित माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच यूएनएड्सच्या सहयोगाने रेड रिबीन इमोजीही आणणार आहे.

#ThereIsHelp नोटिफिकेशन सेवा ट्विटरने गेल्या वर्षी सुरू केली आणि सध्या ती आत्महत्या प्रतिबंध, लसीकरण, बाल लैंगिक छळ, कोविड-19 आणि लिंगाधारित हिंसा यासाठी उपलब्ध आहे. याच नोटिफिकेशन सेवेचा विस्तार ट्विटरने आता एचआयव्ही/एड्ससाठी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जेव्हा युजर्स एचआयव्ही आणि/किंवा एड्स असे कीवर्डस् टाकून शोध घेतील, तेव्हा सर्च रिझल्टमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेत नोटिफिकेशन येईल. यामुळे लोकांना विश्वसार्ह माहिती आणि मदतीचा स्रोत मिळू शकेल. स्थानिक पातळीवरील सरकारी सेवा किंवा एनजीओंच्या बेवसाईटस् किंवा हॉटलाइन नंबर मिळू शकतील.