काँग्रेस अडचणीत, गुलाम नबी ‘आझाद’ होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसमधील पक्षांतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची तयारी सुरू केली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच तेदेखील नवीन पक्षाची स्थापना करण्याची शक्यता आहे.

जम्मू-कश्मीर दौऱ्यावर असलेल्या गुलाम नबी आझाद यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. पूँछ येथे एका जनसभेला संबोधित करताना 2024 मध्ये काँग्रेस पक्ष बहुमताकडे जाणार नाही, असे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे सूतोवाच केले.