लेख – सामाजिक न्यायाचे प्रणेते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • रणवीर राजपूत

हिंदुस्थानी संविधानाचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय म्हणजे उपेक्षित, तेजोहिन अन् सामाजिक चेहरा नसलेल्या समाजघटकांमध्ये मानवी हक्कांबद्दल जागृती निर्माण करणाऱ्या क्रांतिसूर्याचं आगमनच होय. शेकडो वर्षे गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या पददलितांना नवा सामाजिक चेहरा देण्याचं व त्यांना बोलकं करण्याचं ऐतिहासिक कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यातून समाजातली वर्णव्यवस्था व जातिभेदाचे समूळ उच्चाटन करत देशात सामाजिक समता प्रस्थापित केली. सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या बाबासाहेबांचे स्थान आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात अढळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रअभिवादन!

सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने जणू ज्ञानाचं एक नवं विद्यापीठ हिंदुस्थानात नावरूपाला आलं. समाजातील गरीब, उपेक्षित, मागासवर्गीय प्रवर्गातील जाती-जमातीतील लोकांचा शैक्षणिक,  सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रथम आपल्याला उच्चशिक्षित व्हावे लागेल, हे जाणून बाबासाहेबांनी विभिन्न शास्त्र्ाांचा सखोल अभ्यास करण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी विद्वत्ता, कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. केंब्रिज, ऑक्सफर्डसारख्या जागतिक दर्जाच्या नामवंत विद्यापीठांमध्ये विविध सामाजिक शास्त्र्ाांमध्ये एम. ए. (अर्थशास्त्र्ा, राज्यशास्त्र्ा, समाजशास्त्र्ा) केलं, त्यानंतर त्यांनी ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधातून पी. एचडी. संपादन केली. बॅरिस्टर आदी उच्चतम पदव्या आपल्या कठोर परिश्रम अन् बुद्धिमत्तेच्या जोरावर संपादन केल्या.

शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी संभाजीनगर येथे मिलिंद कॉलेज, तर मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज, लॉ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स, कॉमर्स कॉलेज सुरू केली. बाबासाहेबांनी गोरगरीब, गरजू, मागास घटकांसाठी शैक्षणिक सोयीसुविधा व शिष्यवृत्त्या जाहीर करून त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी केलीत. महत्त्वाचे म्हणजे मागासवर्गीयांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळं विणलं. दलित-पददलित समाजबांधवांना ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा पथदर्शक उपदेश दिला. मागासवर्गीयांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी राज्यघटनेत आरक्षण व बढतीच्या तरतुदी केल्या. शिक्षणाच्या माध्यमातून मागास समाजातील निरक्षरता दूर करण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये अनेकदा आवाज उठवला.  सरकारने कृषिमालावर आधारित उद्योग उभारणी केली पाहिजे. कृषी उत्पन्नावर कर लावू नये.  शेतकऱ्यांविषयीचा सरकारचा दृष्टिकोन पारदर्शक व सकारात्मक असावा. त्यांचे सर्वांगीण हित जपणारा असावा. शेती हा सरकारी धंदा (व्यवसाय) म्हणून हवा होता, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. कारण त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची झळ थेट बळीराजाला पडली नसती.

केंद्रीय कायदा मंत्री असताना बाबासाहेबांनी स्त्र्ााr शिक्षण,  स्त्र्ााr-पुरुष समानता अन् स्त्र्ााr स्वातंत्र्यावर अधिक भर दिला. तसेच महिलांच्या हितासाठी 20 हून अधिक कायदे केले. हिंदू मॅरेज ऍक्टचे निर्माते खऱ्या अर्थानं बाबासाहेबच आहेत. कायद्याद्वारे वडिलांच्या संपत्तीत मुलीला लग्नानंतरही मुलाबरोबरीचा समान हक्क प्रदान केला तो बाबासाहेबांनीच. स्त्र्ााr शिकली तर कुटुंबासह समाजाला शिक्षित करण्याची तिच्यात धमक असल्याचे बाबासाहेबांचे ठाम मत होते. महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून आत्मनिर्भर बनविण्याचं अन् स्वाभिमानाचं जीवन जगण्याची त्यांनी दिशा दाखविली. परिणामी आज महिला सबलीकरण होऊन त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आघाडी घेताना दिसत आहेत.

घटनाकार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील ‘आहे रे अन् नाही रे’ यातील दरी मिटवून सामाजिक समता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला.  वास्तविक   बाबासाहेबांनी आपलं आयुष्य देशात ‘स्वातंत्र्य,  समता व बंधुता’ प्रस्थापित करण्यासाठी पणाला लावलं. बाबासाहेब हे सच्चे देशभक्त अन् महान समाजसुधारक होते.

बाबासाहेब हे संसदीय लोकशाही शासनप्रणालीचे पूजक होते. राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी केवळ घटनात्मक मार्गांचाच वापर करावा. घटनेशी प्रामाणिक राहून स्वहितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र हिंदुस्थानचे संविधान तयार केले. याबद्दल तमाम हिंदुस्थानी बाबासाहेबांचे ऋणाईत आहेत,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतावादी विचारांचे युगपुरुष होते. अशा थोर महापुरुषाने 6 डिसेंबर 1956 रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला.  दादरमधील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नियोजित स्मारक भव्यदिव्य  स्वरूपात उभारणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.