विमानतळावर विवस्त्र फोटो शूट केलं, मॉडेलला पडल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळावर विवस्त्र फोटोशूट करणं एका मॉडेलला चांगलंच महागात पडणार आहे. अश्लीलता पसरवल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे.

ही घटना इंडोनेशियाच्या जावा येथे घडली आहे. ओन्ली फॅन्स असं टोपण नाव असलेल्या या मॉडेलचं खरं नाव सिस्काई असं आहे. काही दिवसांपूर्वी ती जावा विमातळावर पोहोचली होती. त्यावेळी तिने एक स्टंट म्हणून कपडे उतरवायला सुरुवात केली. त्याचे फोटोही काढले आणि व्हिडीओही काढला.

हा व्हिडीओ सोशल मीडिया साईटवर अपलोड करून व्हायरल केला गेला. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी यावर आक्षेप घेत तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी बांडुंग शहरातून तिला अटक केली आहे.

तिने बनवलेला व्हिडीओ हाच तिच्या विरुद्ध मोठा पुरावा ठरला आहे. या प्रकरणी तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार असून तिला अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली 18 वर्षं इतकी मोठी शिक्षा देखील होऊ शकते.