
मराठी विज्ञान परिषदेचे छपन्नावे मराठी विज्ञान अधिवेशन जळगाव येथे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने 11 ते 13 डिसेंबरदरम्यान होत आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष पद हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. समीर मित्रगोत्री भूषविणार असून ते ‘मधुमेह, कर्करोगांवरील नवीन उपचारपद्धती’ याविषयी बोलतील. त्याशिवाय अन्नप्रक्रिया, महिला उद्योजक हे दोन परिसंवाद, केळी संशोधनावर व्याख्यान, डॉ. संजय ओक यांची मुलाखत, विद्यार्थ्यांसाठी प्रयोग इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विज्ञानप्रेमींनी https://mavipa.org/events/adhive2111/ या लिंकला भेट द्यावी.




























































