
मुंबईत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचाराचा संदर्भही या आदेशात देण्यात आला असून मुंबईत ओमायक्रोन हा कोविडचा नवा व्हेरियंट पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
एमआयएमची आज रॅली
दरम्यान, मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमने शनिवारी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यातून मुंबईपर्यंत रॅली काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.

























































