बोल्ड लूक, बोल्ड डायलॉग… पाहा तेजस्विनी पंडीतच्या ‘अनुराधा’ वेबसिरीजचा टीझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असा संदेश देणारे मराठी अभिनेत्रींचे व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाले होते. या व्हिडीबाबत लोकांमध्ये फार उत्सुकता होती. नंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने तिच्या आगामी वेबसिरीजचे पोस्टर शेअर करत त्या रहस्यावरून पडदा उघडला होता. तेजस्विनीची अनुराधा ही वेबसिरीज येत असून त्याच्या प्रमोशनसाठी हे कॅम्पेन चालवण्यात आले होते. तेव्हापासून ही वेबसिरीज नक्की कशावर असेल ते पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून अनुराधा वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

या टीझरमध्ये तेजस्विनी बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. वेबसिरीज असल्याने यात शिव्यांचा वापर देखील झाला आहे. तसेच ती सिगारेट पितानाही दिसतेय. यात तेजस्विनीचे बरेच वेगवेगळे लूक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कधी ती सोज्वळ रुपात तर कधी बोल्ड लूक मध्ये दिसली आहे. टीझरच्या शेवटी ती रावडी लूकमध्येही दिसली.

अनुराधा ही वेबसिरीज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्ये दिग्दर्शन असलेल्या या वेबसिरीजमध्ये तेजस्विनी पंडीतसोबत सचित पाटील, सोनाली खरे, सुकण्या मोने, स्नेहलता वसईकर, सुशांत शेलार झळकणार आहेत.