
गोवा तृणमूल काँग्रेसने (‘टीएमसी’ ) महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी (मगोप ) युतीची औपचारिकता मंगळवारी पणजी येथे आयोजित एका मेगा मेळाव्यात पूर्ण केली आली. ‘अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’च्या (AITC )अध्यक्षा ममता बॅनर्जी, AITC सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, AITC राज्यसभा खासदार लुइझिन फालेरो, माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर आणि मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. चर्चिल आलेमाव , लिएंडर पेस, किरण कांदोळकर यांच्यासह गोव्यातील प्रमुख ‘टीएमसी’ नेत्यांसह व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजपच्या कुशासनाच्या विरोधात आवाज उठवताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘टीएमसी-मगोप’ युती एक संयुक्त कुटुंब म्हणून काम करेल, जे फेब्रुवारी 2022 मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करेल. राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी ‘टीएमसी’ने राज्यातील सर्वात जुन्या राजकीय पक्षासोबत युती केली आहे. राजकारणात नेहमीच लोकांच्या हिताचा विचार करावा लागतो. तो विचार करून आपण ही युती करत आहोत. मी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेले नाही. बाहेरच्या लोकांनी गोव्यावर नियंत्रण ठेवावे असे मला वाटत नाही. मला राज्यातील लोकांनी राज्य करावे असे वाटते. तुम्ही लोक तुमचा नेता निवडाल.आता दिल्ली का दादागिरी – नाका, असेही त्या म्हणाल्या.
चंडीपाठाच्या पठणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून, ममता यांनी लोकांना पक्षाच्या धर्मनिरपेक्ष, निःपक्षपाती राजकारणाचे आश्वासन दिले. भाजपद्वारे चालवल्या जाणार्या जातीयवादी अजेंड्याऐवजी, मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते. राज्यात ‘नवी पहाट’ सुरू करण्याच्या ‘टीएमसी’च्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना, ममता बॅनर्जी यांनी , ‘जसे बंगालमध्ये आम्ही भाजपला हुसकावून लावले, त्याचप्रमाणे गोव्यातही ही युती भाजपला यशस्वीपणे राज्याबाहेर नेईल.भाजपचा सूर्यास्त गोव्यातून होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘त्या गरीब ब्राह्मण कुटुंबातील आहे आणि त्या पश्चिम बंगालवर राज्य करत आहेत. याचा आपणा सर्वांना अभिमान असायला हवा. मला सांगायला अभिमान वाटतो.’ टीएमसी’ला अडकवण्याच्या उद्देशाने बनावट व्हिडिओंचा प्रचार केल्याबद्दल त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपच्या जुलमी कारभाराविरुद्ध उभे राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यासाठी खोट्या प्रचाराचा वापर करण्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीचा ढवळीकर यांनी समाचार घेतला.
आंतरराष्ट्रीय टेनिस स्टार आणि आता गोव्याच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले लिएंडर पेस म्हणाले , ‘मी भागीदारीवर विश्वास ठेवतो. मला वाटते भागीदारी नेहमीच यश मिळवून देतात. ही ‘टीएमसी-मगोप’ युती आगामी काळात भरपूर लाभांश देईल.’ थिवी येथे झालेल्या दुसर्या सार्वजनिक सभेत, दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या आणि किरण कांदोळकरांच्या उपस्थितीत, ममता बॅनर्जी यांनी भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे माजी सदस्य अल्विटो डी’कुन्हा यांचे स्वागत केले. पक्षात दाखल झाल्यानंतर अल्विटो म्हणाले, ‘मी दीदींच्या सक्षम नेतृत्वाचा आणि त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या कामाचा प्रशंसक आहे. काँग्रेस आणि इतर पक्ष इतक्या वर्षात भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरले आहेत आणि तृणमूल हा एकमेव पर्याय आहे जो राज्याला बुडण्यापासून वाचवेल.’




























































