व्यापाऱ्याचे 35 लाख लुटणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून 35 लाख रुपये घेऊन पळालेल्या पंकज मिश्राला समतानगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 11 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्याच्या इतर पाच साथीदारांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

नवीन दुकान सुरू करण्यासाठी संदीप गुज्जर या व्यापाऱ्याने मित्राकडून 35 लाख मागवले होते. पैसे घेऊन सायंकाळी घरी जात असताना कांदिवली येथे चोरट्यांनी संदीपच्या गाडीतून पैसे चोरले. याप्रकरणी संदीपने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंदराव हाके यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला.पोलिसांनी 1000 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके गुजरात, हैद्राबाद, दिल्ली येथे गेली. तपासादरम्यान पोलिसांना पंकजची माहिती मिळाली. त्याला गुजरातच्या उमजा येथून ताब्यात घेतले.