
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या सत्रासाठी होणाऱ्या लिलावाची जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना उत्सुकता लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात हा मेगालिलाव घेण्याचा निर्णय आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने घेतल्याचे वृत्त आहे. दोन नव्या संघांच्या ड्राफ्ट निवडीची मुदतही दोन आठवडय़ांपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन नव्या संघांमुळे यंदाचा आयपीएल लिलाव हा 2018पेक्षा मोठा होणार आहे. बंगळुरू किंवा हैदराबादमध्ये हा क्रिकेटपटूंचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
























































