
गेमिंग पंटेंट निर्मितीत आमूलाग्र बदल करत राहताना रूटर या आघाडीच्या गेम स्ट्रीमिंग आणि ईस्पोर्टस् प्लॅटफॉर्मने क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याच्यासोबत भागीदारी केली आहे. ही गेमिंग उद्योगातील पहिलीवहिली भागीदारी युजवेंद्र चहल याला रूटरच्या प्लॅटफॉर्मवर पंटेंट क्रिएटर म्हणून समोर आणेल. चहल हा सध्याच्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंपैकी सर्वात मोठ्या गेमर्सपैकी एक आहेत आणि त्यांना संधी मिळते तेव्हा ते आपला गेमिंगचा छंद जोपासतात. चहल आपल्या पत्नीसोबत तसेच यूटयूब सेन्सेशन धनश्रीसोबत व्हायरल व्हिडिओ बनवण्यात प्रसिद्ध आहेत. रूटरवरील स्ट्रीमिंग समुदाय आणि प्रेक्षकांना आता युजवेंद्र चहल बीजीएमआय व फ्रीफायर खेळायला लाइव्ह जातील तेव्हा त्यांच्याशी चॅट करता येईल, असे रूटरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यान्वयन अधिकारी दिपेश अग्रवाल यांनी सांगितले

























































