
ओमायक्रोन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असताना हिंदुस्थानात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर टाटा एमडीने हिंदुस्थानात कोविड परीक्षण सुविधा विकसित केली आहे. टाटा एमडी चेक एक्सएफ हे एक 3-जीन आरटी-पीसीआर किट आहे, जे आरएनए एक्स्ट्रक्शन-फ्री आहे. यामध्ये इकडून तिकडे सहज नेता येईल अशा आणि जलद क्यूपीसीआर ऍनलायझरसोबत फास्ट ऑम्प्लिफिकेशन प्रोटोकॉलचा उपयोग केला जातो. यात प्रोसेसिंगचा कालावधी फक्त एक तास असतो आणि प्रत्येक मशीन प्रत्येक बॅचमध्ये 30 नमुन्यांवर प्रक्रिया करू शकते.


























































