लोकल अपघातात वाहतूक पोलिसाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल अपघातात प्रसाद मोरे या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान घडली. ते वांद्रे वाहतूक चौकीत पूर्वी काम करत होते.याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

मंगळवारी सकाळी प्रसाद हे शीव रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 4 च्या पुढे काही अंतरावर जखमी अवस्थेत दिसले. स्टेशन मास्टरने दिलेल्या माहितीनंतर दादर रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी प्रसाद यांना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रसाद यांना मृत घोषित केले. प्रसाद यांच्या कमरेला असलेला पोलीस बेल्ट आणि मोबाईलवरून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांचा नेमका मृत्यू कसा झाला हे स्पष्ट झाले नाही. प्रसाद हे 2003 साली मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते.