
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट आली आहे. थंडीच्या लाटेमुळे अनेक राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. थंडीच्या लाटेमुळे बिहारच्या पाटणामधील शाळेत आठवीपर्यंतचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थंडीच्या लाटेमुळे बिहारमधील सरकारी आणि खासगी शाळा 8 जानेवरीपर्यंत बंद असणार आहेत.
देशात वाढत्या प्रकोपामुळे काही राज्यात शाळा बंद आहेत. मात्र, आता पाटणामध्ये थंडीच्या लाटेमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3 जानेवारीपासून 8 जानेवारीपर्यंत शाळेचे आठवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी आणि खासगी शाळांसाठी हा निर्णय लागू असेल.
राज्यातील थंडीच्या लाटेमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा विचार करत पाटणामध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग 8 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट असून जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराकंडमधील अनेक भागात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात घेट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे वाढत्या थंडीपासून मुलांच्या सुरक्षेसाठी आठवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थंडीच्या लाटेमुळे बिहारमधील काही भागात तापमान 2 अशांपर्यंत खाली येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.




























































