
एसटी महामंडळाने निलंबित केलेल्या संपकरी कर्मचाऱयांना बडतर्फ करण्याची मोहीम सुरूच ठेवली असून मंगळवारी तब्बल 221 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचार्यांची संख्या आता 1144 इतकी झाली आहे.
एसटी कर्मचाऱयांचा संप सुरूच असून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत संपात सहभागी 11,024 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱयांना बडतर्फ का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटिसीला उत्तर न देणाऱया किंवा कामावर हजर न होणाऱया कर्मचाऱयांना अखेरीस सेवेतून बडतर्फ करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 2,754 कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, धाराशीव जिह्यातील कळंब आगाराच्या कामावर हजर असलेले वाहतूक नियंत्रक कल्याण पुंभार यांना गाडय़ा बाहेर काढल्या म्हणून संपकरी कर्मचाऱयांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डी. एम. मुंडे, एम. एम. मुळीक आणि ए. व्ही. चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































