नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक 5 बीपासून पुनर्विकासाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीपाठोपाठ नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला राज्य सरकारने गती दिली आहे. नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक 5 बी आज पाडण्यात आली. पुनर्विकासात पाडली जाणारी ही पहिली बीडीडी चाळ असून या चाळीच्या ठिकाणी लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ झाला असून आता जलदगतीने हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली.

नायगाव बीडीडी चाळ क्रमांक 5 बी पाडण्याचे काम आज सुरू झाले तेव्हा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठय़ा व महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाकरिता शासनाने म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱया या चाळी आहेत. सुमारे शंभर वर्षे जुन्या या चाळीतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधायुक्त मोठे घर देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यात येणार आहे.

अशी असेल नवी इमारत

या प्रकल्पामध्ये 3 बेसमेंट स्टील्ट 22 मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनार्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामांच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात 23 चाळींचा पुनर्विकास

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्लॉट ‘ब’मधील 23 चाळी आणि उर्वरित प्लॉट ‘अ’ मधील 19 चाळींचा पुनर्विकास दुसऱया टप्प्यात केला जाणार आहे. पुनर्विकासाचा टप्पा क्रमांक-1 अंतर्गत प्लॉट ‘ब’मधील 23 चाळींपैकी चाळ क्रमांक 5 बी, 8 बी व 22 बीमधील 175 गाळे मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालय विभागास सेवानिवासस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवानिवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामधील 225 चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांचा ताबा म्हाडातर्फे देण्यात आला आहे. त्यानुसार केईएम रुग्णालयाने येथील 175 कर्मचाऱयांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून चाळ 5 बी 8 बी व 22 बी रिक्त करून दिली आहे.

नायगाव बीडीडी-तीन हजार रहिवाशांची चाळ

नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या 42 चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण 3 हजार 344 रहिवासी वास्तव्यास आहेत. या प्रकल्पाकरिता वास्तुशास्त्र्ाज्ञ सल्लागार व प्रकल्पाचे समंत्रक म्हणून मे. संदीप शिव्रे अॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रकल्पाचे पंत्राटदार म्हणून मे. एल. अॅण्ड.टी. कन्स्ट्रक्शन पंपनी लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

– प्लॉट ‘ब’मधील सर्वेक्षण काही रहिवाशांच्या विरोधामुळे होऊ शकले नाही. प्लॉट ‘अ’मधील चाळ क्रमांक 1 अ, 2 अ, 14 अ, 18 अ, 19 अ या 5 चाळीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लाभार्थ्याची 325 अंतिम पात्रता यादी पात्र प्रसिद्ध केली आहे. प्लॉट ‘अ’मधील चाळ क्रमांक 1 अ. 18 अ, 19 ‘अ’मधील 222 पात्र लाभार्थ्याबाबत पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी गाळ्याचा क्रमांक संगणकीकृत आज्ञावलीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांची पात्रता अद्याप संचालक, बीडीडी यांच्याकडून निश्चित केलेली नाही त्या लाभार्थ्यांच्या नावाऐवजी तात्पुरत्या स्वरूपात संचालक, बीडीडी यांच्या नावाची नोंदणी करून गाळेवाटप केले आहे.