
रमाधाम वृद्धाश्रमात आज मातृशक्तीला अभिवादन करण्यात आले. निमित्त होते ममतादिनाचे. यावेळी माँसाहेबांच्या आठवणीने वृद्धाश्रमाचा संपूर्ण परिसर गहिवरून गेला. सुश्राव्य भजनाचे सूर येथील निसर्गरम्य वातावरणात घुमले तेव्हा मातृशक्ती आणि भक्तीचा जणू अनोखा संगम झाला. आजी-आजोबांनीदेखील माँसाहेबांच्या आठवणी यावेळी सांगितल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने माँसाहेबांच्या संकल्पनेतून खोपोलीमधील वृद्धाश्रम उभा राहिला. त्यामुळे या वास्तूला वेगळे महत्त्व आहे. या सर्व आठवणी ताज्या करीत दिवसभर वृद्धाश्रमात विविध उपक्रमांचे आयोजन केले. रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य व सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना सचिव आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख अकोला पूर्व राजू राव यांच्या हस्ते माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ज्ञानाई भजन मंडळाच्या भजनाने रमाधाम भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले. चंदूमामा वैद्य यांनी आजी-आजोबांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, नकी मुंबई महिला आघाडी संघटक रंजना शिंत्रे, नीलम गायखे, अरविंद नारकर, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख कैलास पाटील, तालुकाप्रमुख संतोष विचारे, महिला आघाडीच्या रेश्मा आंग्रे, अनिता पाटील, नीलम चोरगे, सुरेखा खेडकर, कैशाली गायकवाड, खोपोली शहर महिला आघाडी संघटक प्रिया जाधक, अर्चना पाटील, काक्या खोपकर, शैला भगत, छाया चाळके, सुप्रिया साळुंखे, खोपोली उपस्थित होते. याकेळी कैलास पाटील यांनी रमाधामला आर्थिक मदतही दिली.


























































