ठसा – मनोहर नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रचना लचके-बागवे

‘हिप्नॉटिझम’ किंवा संमोहन शास्त्र्ा म्हटले की एक नाव पुढे येतेच येते. ते म्हणजे संमोहन शास्त्र्ाातील बादशहा लिजंड हिप्नोटिस्ट द ग्रेट मनोहर नाईक सर! 10 मार्च 1949 ला वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा या गावी सरांचा जन्म झाला. घरची गरिबी असल्यामुळे काम व नोकरी करून त्यांनी एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर सुरुवातीला गोरेगाव येथील नंदादीप शाळेत क्लार्क म्हणून त्यांनी नोकरी केली. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते एसएनडीटी विद्यापीठ व पिंगेज क्लासेस मुंबई येथे मानसशास्त्र्ााचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, मानसशास्त्र्ा, जादू व संमोहन या कलांची आवड होती. त्यांनी 14 व्या वर्षापासून संमोहन शास्त्र्ा शिकण्यास सुरुवात केली व त्यासाठी वेगवेगळे गुरूही केले. ते वयाच्या 18 व्या वर्षापासून स्वतः संमोहन शास्त्र्ााचे स्टेज शो करू लागले. 1990 मध्ये त्यांनी नोकरीतून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली व पूर्णवेळ संमोहन शास्त्र्ााच्या प्रसारासाठी संमोहन शिबीर, हिप्नॉटिझम प्रशिक्षण वर्ग, तसेच हिप्नॉटिझम स्टेज शो यांचे आयोजन सुरू लागले. त्याला लोकांचा उस्फूर्त व भरपूर प्रतिसाद मिळू लागला. 1966 मध्ये त्यांनी पहिला स्टेज शो केला व फेब्रुवारी 2020 मध्ये वयाच्या एकत्तराव्या वर्षी कोरोना लॉक डाऊनच्या अगोदर फाईन आर्ट चेंबूर येथील हॉलमध्ये त्यांनी आयुष्यातील शेवटचा स्टेज शो केला. या पंचावन्न वर्षांत त्यांनी सहा हजारांपेक्षा जास्त स्टेज शो सादर केले. कार्यक्रम, स्टेज शो शिबिराच्या निमित्ताने त्यांनी अमेरिका, थायलंड, सिंगापूर, दुबई, शारजा, मलेशिया येथे परदेश दौरे केले. तसेच हिंदुस्थानातील जवळजवळ सगळ्या मोठय़ा शहरात व राज्यात व महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यात व गाव पातळीवरही त्यांनी संमोहन शो सादर केले. शिवाय देशात व देशाबाहेरही त्यांनी संमोहन प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यांचे हजारो संमोहन शिष्य संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलेले आहेत. त्यांनी संमोहन शास्त्र्ा, मानसशास्त्र्ा, अध्यात्म व योगशास्त्र्ा या विषयावर पंचेचाळीस पुस्तके लिहिली. यातील काही पुस्तके बेस्ट सेलर असून त्याच्या एक लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या किंवा वितरित केल्या गेल्या. तसेच त्यांच्याकडे संमोहन शास्त्र्ा शिकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना संमोहन शास्त्र्ाात आलेल्या अनुभूतीवर सात पुस्तके प्रकाशित केलीत.