
अनोळखी व्यक्तीला कधीही कोणी उधारीवर वस्तू देत नाही. परंतु एका फेरीवाल्याने एका अनोळखी व्यक्तीला फुकटात शेंगदाणे खायला दिले. ज्याचे पैसे अनेक वर्षांनी त्याने व्याजासकट परत केले आहे. शेंगदाण्याचे कर्ज फेडण्यासाठी 11 वर्षांनंतर अमेरिकेतून आलेल्या भावंडांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
ही घटना आंध्र प्रदेशातील यू कोथापल्ली येथील आहे. 2010 साली मोहन कुटुंबासमवेत फिरायला आले होते. त्यांच्यासोबत मुलगा नेमानी प्रणव आणि मुलगी सुचिता होती. मोहन यांनी मुलांसाठी खारे शेंगदाणे विकत घेतले. मात्र शेंगदाणे विव्रेत्याला द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. कारण ते पाकीट घरी विसरले होते. त्याच वेळी मोहन यांचा मुलगा नेमानी प्रणव याने शेंगदाणा विव्रेत्याला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आणि त्याच्यासोबत पह्टो काढून ते तेथून निघून गेले.
सतैया असे शेंगदाणे विकणाऱया माणसाचे नाव होते. या घटनेनंतर मोहन कुटुंबासह अमेरिकेला निघून गेले. या घटनेला 11 वर्षे उलटल्यानंतर नेमानी प्रणव आणि त्याची बहीण सुचिता हिंदुस्थानात परतले. त्यांनी शेंगदाणा विव्रेत्याचा शोध घेतला. मात्र शेंगदाणा विव्रेता सतैया यांचा मृत्यू झाला होता. प्रणव व सुचिता या भावंडांनी त्याच्या कुटुंबाला भेट देऊन 25 हजार रुपये दिले.


























































