रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरणारा गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेसावध असणाऱया प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱया चोरटय़ाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. ज्ञानसिंग कुशवाह असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लॅपटॉप, दोन बॅगा जप्त केल्या आहेत. ज्ञानसिंगच्या अटकेने काही चोरीच्या गुह्यांची उकल होणार आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड दरम्यान लोकल प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या बॅगा चोरीला जात असल्याच्या घटना घडत होत्या. बॅगा चोरणाऱयाला बेडय़ा ठोकण्यासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड, कवठेकर, लांडगे, शिर्सेकर, गोडे, लवटे, पाटील, कांगणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी रेल्वेच्या हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजचीदेखील तपासणी केली. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी खबऱयाची मदत घेतली. खबऱयाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ज्ञानसिंगला मुलुंड येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने बॅगा चोरल्याची पोलिसांना कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सहा लॅपटॉप, दोन बॅगा जप्त केल्या आहेत. ज्ञानसिंगविरोधात कुर्ला आणि पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.