सोलापुरात ओमायक्रॉनचा रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला असून, आठवडय़ाच्या उपचारांनंतर तो बरा झाल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. लोधप यांनी सांगितले आहे.

सोलापुरात चार दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. 27 डिसेंबर रोजी शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याच्यावर सोलापुरात, मुंबईत उपचार करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांना व संपर्कातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. तोही उपचारांनंतर बरा झाला आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. लोधप यांनी दिली. लसीकरण झालेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली तरी लक्षणे सौम्य असल्याचेही डॉ. लोधप यांनी सांगितले.