
‘शेतकऱ्यांचं पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला सध्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 50 वर्षांतील विक्रमी दर मिळत आहे. कापसाचा हमीभाव 6 हजार 25 रुपये असतानाही बाजारात कापसाची आवक कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने प्रतिक्विंटलला तब्बल 10 हजार 400 रुपये एवढा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. एकाच दिवसात 32 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.























































