
कारची रिक्षाला धडक लागल्याने झालेल्या अपघातात जयेश क्षत्रिय या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक इंद्रजित यादव हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी विजय गोविलकर या चालकाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.
इंद्रजित हा रिक्षाचालक असून बुधवारी दुपारी इंद्रजित हा त्याचा मित्र जयेशसोबत रिक्षाने अंधेरीला जात होता. तेव्हा अंधेरीच्या जैन मंदिर परिसरातून जात असतानाच भरधाव कारने रिक्षाला धडक दिली. त्या धडकेत इंद्रजित आणि जयेश हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच जुहू पोलीस घटनास्थळी आले. त्या दोघांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केले, तर इंद्रजितवर उपचार सुरू आहेत.


























































