
पारनेर तालुक्यात 38 वर्षांपूर्वी दरोडा टाकणारा आणि शिक्षा लागल्यापासून 15 वर्षे फरार असलेल्या सुरेश महादू दुधावडे (हल्ली रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) या दरोडेखोराला जुन्नर तालुक्यातील ठाकरवाडी परिसरातून पकडले आहे.
पारनेर तालुक्यात 1982 मध्ये पडलेल्या दरोडय़ात आरोपी सुरेश दुधावडे याला अटक करण्यात आली होती. यात त्याला शिक्षा झाली होती. मात्र, त्याने संभाजीनगर खंडपीठात अपिल दाखल केले. खंडपीठानेही दरोडय़ाच्या गुन्ह्यात त्याला दोषी धरले. मात्र, 14 ऑक्टोबर 2005 पासून जामिनावर सुटल्यावर तो फरार झाला होता.
खंडपीठाने त्याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला. तो नारायणगावजवळील ठक्करवाडी येथे राहत असल्याचे आढळून आले. तेथून त्याला अटक करण्यात आली.
























































