बाबा, आत्महत्या करायला जातेय! वडिलांशी फोनवर बोलून मॉडेलने मारली उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडिलांना फोन करून एका मॉडेलने सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे. ही घटना जोधपूर इथल्या रातानाडा परिसरातील लॉर्ड्स हॉटेलमध्ये घडली आहे.

या तरुणीचं नाव गुनगुन उपाध्याय असं असून ती जोधपूरच्याच गणेश उपाध्याय यांची मुलगी आहे. ती लॉर्ड्स हॉटेलमध्ये थांबली होती. तिने शनिवारी अचानक वडिलांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. ती फोनवर म्हणाली की, मी आत्महत्या करायला जातेय. फक्त माझा चेहरा बघा, असं म्हणून तिने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली.

तिच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तिच्या फोनवरून तिचं लोकेशन शोधलं. पण, त्यापूर्वी गुनगुनने उडी मारली होती. ती खाली पडून बेशुद्ध झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या बरगड्या आणि पायांना फ्रॅक्चर झालं असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला रक्तस्राव झाला असून रक्त चढवण्यात येत आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचं कारण अस्पष्ट आहे.