22 किलोमीटर लांब बेट रहस्यमय पद्धतीने गायब, शास्त्रज्ञही अचंब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या जवळ असणारं एक बेट रहस्यमयरित्या गायब झालं आहे. हे बेट प्रशांत महासागरात होतं. या बेटाचं नाव सँडी आयलँड असं आहे. ते यापूर्वीही त्याच्याशी निगडीत रहस्यांमुळे प्रसिद्ध होतं.

1774मध्ये जेम्स कुक नावाच्या माणसाने हे बेट शोधल्याचा दावा केला होता. ऑस्ट्रेलियन किनाऱ्यापासून नजीकच असलेलं हे बेट 22 किलोमीटर लांब आणि 5 किमी रुंद होतं. 1876 साली, जेम्स कुकनंतर वेलॉसिटी नावाच्या एका जहाजाने देखील हे बेट असल्याचा दावा केला होता. 19व्या शतकात ब्रिटन आणि जर्मनीच्या संशोधकांनीही हे बेट असल्याचा दावा केला होता. पण, काही काळानंतर हे बेट खरोखर आहे का, यावर शंका उपस्थित केली जाऊ लागली.

फ्रेंच हायड्रोग्राफिक सर्व्हिसने आपल्या नॉटिकल चार्टमधून 1979मध्ये हे बेट काढून टाकलं. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2012मध्ये ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना हा शोध लागला की हे बेट वास्तवात अस्तित्वाच नाही. या दरम्यान शास्त्रज्ञांनी बेटाची जागा दाखवलेल्या ठिकाणी समुद्राची खोली मोजायचा प्रयत्न केला. ती खोली 4300 फुटांपेक्षा जास्त नव्हती.

सिडनी विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्राच्या प्रमुख मारिया सेटन यांच्या म्हणण्यानुसार, तिथे कधीच बेट नव्हतं. कदाचित काहीतरी गैरसमज झाला होता. तसंच सँडी आयलँड- एन ऑबिच्युरी नावाच्या एका प्रबंधातही सँडी नावाचं कोणतंही बेट कधीच अस्तित्वात नसल्याचं म्हटलं आहे.