‘पीसीपीएनडीटी’ची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पीसीपीएनडीटी’ समितीची 60 दिवसांतून किमान एक बैठक होणे गरजेचे असताना, एप्रिल 2020 ते मार्च 2021 या संपूर्ण वर्षात एकच बैठक झाली आहे. अतिरिक्त संचालकांनी सोलापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीसही बजाविली आहे. याबाबत सर्व चौकशी करण्यात येणार आहे. सोलापुरात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची पायमल्ली होत असेल, तर कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार कोणत्याही वाहनाला ‘ओपीडी’पर्यंत सोडले जात नाही. तसेच तीन प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. याचा फटका थेट रुग्णांना बसत आहे. उपचारांसाठी दाखल होताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा विरोध अनेक सामाजिक संघटनांनी करीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले. यावर मंत्री टोपे म्हणाले, ‘सिव्हिल रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. त्याबाबत काळजीपूर्वक विचार करू. जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांना त्याबाबत सक्त सूचना देऊ.’

‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती असते आणि त्या समितीनुसार कामकाज चालते. ‘पीसीपीएनडीटी’ समितीची 60 दिवसांतून किमान एक बैठक होणे गरजेचे असताना, एप्रिल 2020 ते मार्च 2021 या संपूर्ण कर्षात एकच बैठक झाली आहे. अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत 3 मे 2021 रोजी सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांना नोटीसही बजाविली आहे. याबाबत सर्व चौकशी करून कडक कारवाई करू,’ असे मंत्री टोपे म्हणाले.